मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. सेना भाजप वाद सुरू असतानाच दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.